दोन पेक्षा अधिक खुर्च्या घेऊन बसलेल्या खुर्च्या जप्त
मतदान केंद्राच्या बाहेर दोन पेक्षा अधिक खुर्च्या घालून कार्यकर्ते बसलेले पाहिल्यावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पोलिसांना त्या खुर्च्या जप्त करायला लावल्या.
मतदान केंद्राच्या बाहेर प्रत्येक उमेदवाराला एक टेबल आणि दोन खुर्च्या घालण्याची परवानगी देण्यात आली होती.जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करत असताना वडगाव येथे दोन पेक्षा अधिक खुर्च्या घालून कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले .
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दोनपेक्षा जास्त असलेल्या खुर्च्या जप्त करायला लावल्या.जप्त केलेल्या खुर्च्या एका वाहनातून नेण्यात आल्या.मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना देखील यावेळी पोलिसांनी तेथून हटवले.