वीरशैव लिंगायत फोरमचा पाठिंबा काँग्रेसला -13 तारखेची उत्सुकता शिगेला
कर्नाटक राज्यात वीरशैव लिंगायत फोरम लिंगायत वोट बँक ला खूप महत्त्व आहे. आणि याचा आता फायदा काँग्रेसला होणार असल्याचे दिसत आहे.कारण वीरशैव लिंगायत फोरमने आपल्या पाठिंबाचे पत्र काँग्रेसला दिले आहे त्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. लिंगायत समाजाची मते मिळविण्याकरिता जेडीएस काँग्रेसने कंबर कसली आहे.
त्यातच आता वीरशैव लिंगायत फोरमने काँग्रेसला खुला पाठिंबा दिला असल्याने काँग्रेस येणाऱ्या निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे.सामाजिक दृष्ट्या राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात शक्तिशाली लिंगायत समाज आहे हा समाज गेल्या शंभर वर्षांपासून काँग्रेसची जुळलेला आहे.
मात्र आता गेल्या काही दशकांपासून काँग्रेसची ही मते भाजपकडे वळलेली होती तर आता ही सर्व मते काँग्रेसकडे वळणार असल्याने भाजपला चांगला धक्का बसला आहे.त्यामुळे जातीयवाद करून दिलेली तिकिटे भाजपला सध्या महागात पडणार असल्याचे चित्र दिसत आहे कारण कर्नाटकातील वीरशैव लिंगायत फोरमने काँग्रेसला आपला खुला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 13 तारखेची निकालाची उत्सुकता सध्या शिगेला पोचली आहे.