बेळगाव उत्तर मतदार संघासाठी शहरातील मराठी समाज एकवटला.
बेळगाव शहरातील उत्तर मतदार संघात गेल्या 25 वर्षात समितीला प्रतिनिधित्व मिळाले नाही. 2008 – 2013 दोन्ही वेळी मराठी मतांची विभागणी होऊन मराठी माणसाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अनेकांनी राष्ट्रीय पक्ष्यात जाणे पसंत केले.
पण राष्ट्रिय पक्षात मराठी माणसाला काही सन्मान मिळत नाही हे पाहता अनेकांचा हिरमोड झाला. या सर्व परिस्थिती मध्ये 2023 साली तर राष्ट्रीय पक्ष्यांनी मराठी माणसाचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही आणि या निर्माण झालेली परिस्थिती मराठी लोकांनी पुन्हा एकदा समितीचा भगवा हाती घेण्याचा निर्णय घेतला. आणि मराठी समाज एकवटण्यास सुरुवात झाली. मराठी माणसाला गृहीत धरण्याऱ्या राष्ट्रीय पक्ष्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली.
मराठी माणसाला फितविण्यासाठी धनशक्ती चा वापर होऊ लागला आहे. बेळगाव उत्तर मतदार संघ किंबहुना बेळगाव शहरात मराठी माणसाची मते निर्णायक असतात हे ध्यानात आल्यावर कायम मराठी माणसाच्या विरोधात काम करणारे हे राष्ट्रीय पक्ष अचानक मराठी बद्धल कळवळा दाखवू लागले. यांचा संपूर्ण प्रचार मराठीत होऊ लागला. ज्या महाराष्ट्राचा दुष्वास हे लोक करतात त्याच महाराष्ट्रातील नेते आणून मराठी माणसाला आपल्याकडे वळविण्यासाठी भाडोत्री कार्यकर्ते आणून गर्दी दाखवून मराठी लोकांना भुलविण्याचा सपाटा सुरू झाला. पण या सगळ्याला मराठी माणूस बळी पडत नसल्याचे लक्षात आल्यावर शेवटी समितीला मत दिले तर हिंदुत्व हरेल म्हणून खोटा प्रचार सुरू करण्यात आला.
पण मराठा समाज याला बळी पडणार नाही. पक्षीय प्रचार करणाऱ्या मराठी लोकांनी आता समितीच्या प्रवाहात येवून मराठी समाज एकसंध करणे महत्वाचे आहे. याची सुरुवात बेळगाव मधील अनेक गल्ल्यामधून सुरू झाली . अनेक गल्ल्यातील युवक मंडळांच्या फलकावर अमर यळूरकर यांना जाहीर पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे. तरीही भ्रामक आकडेवारी दाखवून मराठी माणसांनी समितीला मतदान कडू नये असा अपप्रचार राष्ट्रिय पक्ष्यांच्या लोकांनी सुरू केला आहे पण यावेळी मराठा समाज एक होणार आणि मतदान करणार आल्याचे अनेक भागातून जाहीरपणे बोलले जात आहे. त्यासाठीच राष्ट्रीय पक्ष्यांचे गल्लीपासून दिल्ली पर्यंतचे नेते सीमाभागत समितीच्या विरोधात प्रचार करत आहेत. या सगळ्यात दुर्दैव ते काय की मराठी माणसाला हरविण्या साठी आपलेच मराठी लोक या राष्ट्रिय पक्ष्याची गुलामी करत आहेत.
तरी अश्या लोकांना येणारा काळ माफ करणार नाही हे नक्की. एकवटणाऱ्या मराठा समजाची वज्रमूठ आता झाली पाहिजे. मराठा समाजाला मिळणारी दुय्यम वागणूक, छ शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचा अपमान यावरचे राष्ट्रीय पक्षांचे मौन , मराठी. भाषेवरील हल्ले, या सगळ्याचा मतदानाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्धार मराठी लोकांनी केलेला आहे. म्हणून एक मराठा लाख मराठा या घोषणा आता स्फूर्ती देत आहेत..