सीमाभागात प्रचार करणार नाही :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सीमा वासियांच्या कोणत्याही भावना दुखावल्या जाऊ नये याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री रवींद्र फडणवीस आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे बेळगाव मध्ये प्रचाराकरिता आले असता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि सीमा भागातील नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले होते.
महाराष्ट्रात अनेकांच्या गाठीभेटी घेऊन सीमा प्रश्नसंदर्भात लक्ष पुरवावे अशी अनेक नेत्यांनी मागणी केली होती त्यामुळे ही सर्व गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन सीमा भागात प्रचार करणार नाही असा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे सीमा भागात स्वागत होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकात सहा आणि आठ मे रोजी प्रचाराकरिता येणार होते. मात्र याआधी दोन वेळा सीमावासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने परिस्थितीशी जाणीव करून घेऊन आपण सीमा भागात हजेरी न लावणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कोणताही प्रचार करणार नसल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.