*घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार विकू नका*-प्रा मधुरा गुरव
गोजगा;
श्रीमंत गरीब स्त्री पुरुष या सर्वांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे.या मतदान प्रक्रियेतून आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी निवडायची संधी दिलेली आहे या संधीचा उपयोग आपली शेती जमीन, आपली मराठी भाषा,मराठी संस्कृती आणि मराठी स्वाभिमान जतन करण्यासाठी करूया. गेली पंधरा वर्षे आमच्या या ग्रामीण मतदारसंघात पैसे आणि वस्तूच्या रूपाने मते खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण यावेळी त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडूया आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांना प्रचंड मतांनी विजयी करूया असे विचार प्राध्यापक डॉक्टर मधुरा गुरव यांनी व्यक्त केले.
गोजगा येथे आर एम चौगुले यांच्या समर्थनात महिलांची बैठक पार पडली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य कमल मन्नोळकर यांनी राष्ट्रीय पक्षाकडून भांडी कुक्कर साड्या देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असून त्याला भीक न घालता समितीच्या पाठीशी रहा असे सांगितले
माजी जि. पं. सदस्या माधुरी हेगडे, माजी आंबेवाडी गाम पंचायत अध्यक्षा मंगला कालकुंद्री यांनीही आपले विचार मांडले. यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी आर एम चौगुलेंच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली.