दक्षिण मतदार संघात दक्षिण की बात अभय पाटील के साथ
दक्षिण मतदार संघात दक्षिण की बात अभय पाटील के साथ हा एक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जनतेने आमदार अभय पाटील यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी आमदारांना प्रश्न विचारले यावेळी त्यांच्या प्रश्नांचे निरकरण आमदारांनी केले.
यावेळी नागरिकांनी त्यांना स्मार्ट सिटी संदर्भात विकास कामात संदर्भात तसेच नागरिकांच्या सोयी सुविधा संदर्भात प्रश्न विचारले असता आमदारांनी त्यांना योग्य उत्तरे दिली.
आणि ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या येणाऱ्या काळात पूर्ण करू अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर येणाऱ्या काळात नवीन प्रकल्प उभारून उद्योगाला चालना देणार असल्याचे यावेळी आमदारांनी जनतेला या कार्यक्रमात सांगितले.