कुडची भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर यळूरकर यांच्या प्रचाराचा झंझावात
30 मे रोजी सायंकाळी कुडची भागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री अमर येळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली गावातील महिला तसेच युवक वर्ग समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने यांच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते शेकडून नागरिकांच्या सहभागामुळे कुडची गाव समितीमय झाले होते महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून अमर येळूरकर यांचे स्वागत केले. गावातील बहुसंख्य मराठी लोकांनी अमर येळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला.त्यांचा प्रचार दरम्यान गावातील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अमर येळूरकर आणि शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छोटी सभा घेण्यात आली या सभेमध्ये अनेक वर्षानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खुर्ची गावामध्ये समितीला बळ मिळाल्याचे चित्र दिसत होते पंचवीस वर्षांचे कसर भरून काढण्याचा निर्धार यावेळी समस्त गावकऱ्यांकडून करण्यात आला.
यावेळी बाल शिवाजी लाटेमेळा जय युवक मंडळ जय शिवाजी युवक मंडळ सुदर्शन युवक मंडळ श्री गजानन तरुण युवक मंडळ यांचे कार्यकर्ते व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी जोतिबा मुतगेकर किसन कडेमनी नामदेव जैनोजी गळघु चौगुले सुनील निरजकर लखन चौगुले गजानन कोलूचे ज्योतिबा बेडका राजू चौगुले नागेश तारळकर सुहास परशराम ज्योतिबा मुतगेकर नामदेव मुदगेकर विठ्ठल मल्लाप्पा कोळसे वसंतारकर वामन बेडका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिला वर्ग सहभागी झाले होते.