राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे मावळे व्हा
-मा आमदार मनोहर किणेकर
हिंडलगा:राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे मावळे व्हा असा सल्ला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला.
काल म ए समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांच्या हिंडलगा परिसरात झालेल्या प्रचार पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
मराठीच्या अस्तित्वासाठी येत्या दहा मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आर एम चौगुले यांना भरगोस मतांनी विजयी करा असेही त्यांनी सांगितले.
मरगाई गल्ली, महादेव गल्ली, नविन वसाहत, हायस्कूल रोड आणि रामदेव गल्ली परिसरात फिरून लक्ष्मी गल्लीत सांगता झाली.
यावेळी आर एम चौगुले यांनी घागर या चिन्हा समोरील बटन दाबुन प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले.
संपूर्ण फेरीत भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्रचंड फेरीमुळे हिंडलग्यात समितीचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले.
ही प्रचारफेरी यशस्वी करण्यासाठी रामचंद्र कुद्रेमानीकर,नागेश किल्लेकर, उदय नाईक, विनायक पावशे, संदीप मोरे, अनिल हेगडे अरुण कुडचीकर बाळू सावगवकर, अर्जुन जकाने, याल्लाप्पा काकतकर, भाऊराव कुडचीकर, बळीराम किल्लेकर संतोष मंडलीक सतिष नाईक, सागर मेणजे, अशोक पावशे, बाळकृष्ण पावशे व इतरानी परिश्रम घेतले.
या फेरीत माता भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.