येळ्ळुर न्यू सैनिक सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला शिक्षा
जिल्हा ग्राहक न्यायालयाने येळळुर न्यू सैनिक सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला शिक्षा आत देण्याचा आदेश दिला आहे यामध्ये चेअरमन डॉ जी आय पाटील आणि सेक्रेटरी मेघराज एम कुगजी यांना तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्यांना या दोघांना ग्राहक न्यायालयाने यासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे ती यामुळे येळळुर येथील रहिवासी श्रीधर मारुती पाटील यांनी येळळुयेथील न्यू सैनिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवणूक केली होती.त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची मुदत संपली होती तरीही चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी त्यांना पैसे देण्यास टाळा चालवली होती त्यामुळे श्रीधर पाटील यांनी चेअरमन डी जी आय पाटील व सेक्रेटरी मेघराज कुगुजी यांच्या विरोधात ग्राहक न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली होती.
त्यानंतर श्रीधर पाटील यांनी गुंतवणूक केलेली रक्कम तसेच त्याचे व्याज दंड आधी सर्व रक्कम त्यांना परत देण्यात यावे असा आदेशही यापूर्वी देण्यात आला होता.मात्र त्या आदेशाचे पालन झाले नसल्याने मुख्य न्यायाधीश संजीव कुमार आणि नैना कामते यांनी त्या दोघांनाही तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.