*जातिधर्म भाषा भेदभाव न करता सर्व समाजाचा सर्वांगीण विकास साधावा : रमाकांत कोंडुसकर*
*मराठमोळ्या संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सर्व जनतेने आज पुढे नेण्याची काळाची गरज: होसुर शहापूर खासबाग कुंती नगर ओम नगर टीचर्स कॉलनी पीबी रोड शृंगेरी कॉलनी जोशी मळा यासह येथील सर्व परिसरात प्रचार : रमाकांत कोंडूस्करणा वाढता पाठिंबा*
————–
बेळगाव, तारीख ( 26 एप्रिल 2023) : बेळगाव हे मराठी संस्कृती जपणारे शहर असून या ठिकाणी त्यांनी राज्यांचा संगम साधला गेला आहे. बेळगाव सीमाभागात भाषावार प्रांत रचने नंतर गेल्या 66 वर्षापासून अविरत असा हा लढा पुढे नेण्याचा प्रयत्न समितीने केलेला आहे. मराठी माणसांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि मराठमोळ्या संस्कृती जोपसण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्य करणारी समिती ला बळ देणाऱ्यांसाठी आज तमाम माता भगिनी आणि बंधूंचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळाला हवे. कर्नाटकच्या दडपशाही आपला मराठी समाज वेळोवेळी दबला जात आहे. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केले जात आहेत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी माणसाने सतत जागृत होऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला मराठी माणूस निवडून देणे अत्यंत काळाची गरज बनली आहे. मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकत्र येणे तर अत्यंत आवश्यकच आहे. त्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, भाषा भेद न करता सर्वांना सामावून घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेला पाहिजेत हाच सर्वांगीण परिपूर्ण विकास साधला गेला पाहिजे. आम्ही समितीच्या माध्यमातून बेळगाव सीमा भागामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू . मराठी शाळेच्या प्रश्नाचा न्याय देऊ. वाचनालय उभे करून संवर्धन करू. समाजातला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार मिटून काढू. समाजात पसरलेली व्यसनाधीनता दिवसेंदिवसवाढते आहे . समाज सुसंस्कृत आणि सुदृढ बनवण्यासाठी समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. समस्या सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक लोकप्रतिनिधीनी वेळोवेळी जनतेवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे वेळोवेळी दडपशाही केलेली आहे शेतकऱ्यांच्या कमी भावात त्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर अनेक प्रकरणात ना दम दिला जातो आणि गोरगरिबांना घाबरून सोडले गेले आहे. यासाठी मराठी माणसाने घाबरून जायचे नाही. आता याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही सदोदित समाजाच्या सेवेसाठी नेहमीच अविरत कार्य करू आणि मराठी माणसांना प्रगती पाथावर नेण्यासाठी नेहमीच कार्य केले जाईल असादृढ निश्चय मी करतो आहे. तमाम युवक युतीने आपल्या मराठी संस्कृतीची जाणीव करून घेऊन ती परंपरा कशी टिकली जाईल याकडे सुद्धा आपल्या समाजाने गांभीर्याने बघितले पाहिजेत तरच ते संस्कार पुढील पिढीसाठी आदर्श राहतील आणि तो आदर्श व परिपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी आज मराठी माणसाला निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे. मराठमोळ्या संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सर्व जनतेने आज पुढे नेण्याचे कार्य हाती घेतले पाहिजेत असे *प्रतिपादन दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी केले.*
बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता शिवाजी महाराज उद्यान शहापूर परिसरात मोठ्या उत्साहाने दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या पदेत्रेला मोठ्या प्रमाणात प्रारंभ झालं आणि जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. पदयात्रीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून प्रचार फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान पासून शिवचरित्र देखावा सृष्टी समोर असणारा परिसर, तांबे गल्ली , होसूर, हरिजन वाडा, होसुर बसवान गल्ली , ओम नगर, आणि सर्व क्रॉस येथे विशेष जागृती, ओल्ड पी.बी.रोड आणि इतर सर्व क्रॉस टीचर्स कॉलनी, कुंती नगर , जोशी माळासह सर्व क्रॉस कुंती नगर ते पीबी रोडवरील असणारे सर्व क्रॉस या भागामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रचार फेरीत बहुसंख्येने उपस्थित दर्शन जागृती केली.
*संभाजी रोड खासबाग येथील खासबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विशेष क्रेनच्या सहाय्याने खूप मोठा हार दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना घालून त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून मोठ्या प्रमाणात जाहीर पाठिंबा देण्यात आला; प्रसंगी उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा विशेष स्वागत करून गौरव करण्यात आला.* छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बंडू जाधव , ॲड. श्रीकांत पवार, रुपेश भडस्कर , पप्पू पठाडे, सदानंद माळवी , श्रीधर पाटील, शेखर पाटील , श्याम कोडूस्कर, नगरसेवक रवी साळुंखे , किरण गावडे , रणजीत चव्हाण-पाटील, माजी नगरसेवक अनिल पाटील सुधा भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे , नेताजी जाधव, प्रशांत भातकांडे , विजय भोसले, विजय पाटील , अजित पाटील,भरत नागरोळी, सागर पाटील, आप्पाजी काकतकर, विजय भोसले, बाळू जोशी, बंडू देसाई यांच्या हस्ते उमेदवाराचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी क्रेनच्या माध्यमातून झेंडू, गुलाब, तुळशीपत्र, शेवंती, आणि इतर फुलांसह *साठ फुटाचा* विशेष हार घालण्यात आला होता आणि तो हार क्रेनच्या माध्यमातून रमाकांत कोंडुसकर यांना अर्पण करून विशेष सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला; यावेळी घोषणा देऊन समितीचा विजय असो आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. भगवे फेटे भगवे झेंडे आणि भगवे कुडते घालून संपूर्ण भगवे वातावरण करण्यात आले होते. मराठीच्या जागर करण्यात आला. मराठी माणसाने अमीशांना बळी पडू नये. तरुण आणि तरुणींनी या समूहात सहभागी होऊन समितीला भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या भागातील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान युवक मंडळ शहापूर, मठ गल्ली विभागीय संघ शहापूर, खासबाग गणेशोत्सव मंडळ ओमनगर युवक मंडळ , कुंती नगर, युवक मंडळ , शृंगेरी कॉलनी, युवा संघटना, कुंती नगर सामाजिक संघटना, टीचर्स कॉलनी युवक मंडळ, खासबाग गणेशोत्सव मंडळ, कृषी माळा युवक मंडळ, संभाजी रोड सामाजिक संघटना, खासबाग महिला मंडळ आणि पंचमंडळी ग्रामस्थ तसेच विविध को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पतसंस्था, सार्वजनिक फंड सह इतर समाजातील बहुभाषिक नागरिकांनी पाठिंबा दिला. वेगवेगळ्या मंडळांनी पाठिंबा जाहीर करून समितीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी करण्यात आले. वेगवेगळ्या कोपऱ्या कोपऱ्यावरती असणाऱ्या सार्वजनिक फलकावरती विशेष दक्षिणचे उमेदवार यांना सार्वजनिक मंडळे व महिला मंडळ आणि या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांतून विशेष पाठिंबा देण्यात आला.
संजय तांजी, उदय पाटील, सागर देशपांडे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिरजे, विजय हांडे, एस. एस. पाटील, ज्ञानेश सराफ, महादेव पाटील, उमेश पाटील, सागर पाटील, शेखर पाटील, प्रा. आनंद आपटेकर, प्रा. एन. एन. शिंदे, विशाल कंगराळकर, श्रीकांत कुराळकर, भरत पाटील, सचिन पाटील, बाबू नावगेकर, राजु बैलूरकर अभिजीत पुजारी संतोष पोटे युवराज देसाई समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते पंचम मंडळी महिला मंडळ युवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*उद्याची नियोजित प्रचार फेरी – पदयात्रा*
रमाकांत कोडुसकर यांची पदयात्रा गुरूवारी सकाळी शहापूर
सायंकाळी मच्छे गावात
* म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ छ. शिवाजी महाराज उद्यान येथून होणार आहे.
त्यानंतर बोलमल गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, जोशी गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डब्बल रोड मार्गे बॅ.नाथ पै चौक येथे सांगता.
सायंकाळी पाच वाजता झाडशहापूर गावातून प्रारंभ संपूर्ण झाडशहापूर गाव फिरून मच्छे गावात पदयात्रेचा प्रवेश त्यानंतर संपूर्ण मच्छे गावात पदयात्रा फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जातील.
पदयात्रेत या भागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
_____________*