*बिजगर्णी महालक्ष्मी यात्रा पुढील वर्षी*
“30 वर्षानंतर 2024 मध्ये होणार यात्रा
“बिजगर्णी,कावळेवाडी, आणि राकसकोप येथील महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव 2024 मार्च -एप्रिल मध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंगळवारी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानिमित्ताने आज तिन्ही गावातील सर्व मंदिराना गाऱ्हाणे घालून गाव प्रदक्षिणा घालण्यात आले. तब्बल 30 वर्षानंतर महालक्ष्मी यात्रा होणार असल्याने ग्रामस्थात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिजगर्णी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर यांनी प्रास्ताविक करुन यात्रेसंदर्भात गावकऱ्यांची मते मांडण्याची सूचने नुसार हा निर्णय घेण्यात आला.ग्रामस्थ कमिटी सेक्रेटरी विष्णू जो. मोरे, खजिनदार कल्लापा धो. अष्टेकर , दामु मोरे, श्रीरंग भास्कळ , जक्कापा मोरे, यशवंत जाधव, मारूती वि. जाधव, जोतीबा धो. मोरे, सुभाष पाटील, विष्णू कोळी, बंडू भास्कळ, सह गावकरी आजी माजी लोकाप्रतिनिधी व मान्यावर उपस्थित होते.
गावातील जेष्ठ ताराचंद्र जाधव व माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव,माजी शिक्षक कल्लाप्पा भास्कळ, नारायण चौगुले यांनी खूप वर्षानंतर ही यात्रा होत असल्यामुळे गावाच्या विकासाच्या व इतर गोष्टीच्या संदर्भात आदींनी मनोगत मांडले.
काहींनी पुढील वर्षी तर अनेक ग्रामस्थांनी 2024 मध्ये यात्रा भरवण्यात यावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थितांनी यात्रा भरवण्यासाठी एकमताने संमती दिली. त्यानंतर तातडीने आज गाऱ्हाणे घालून प्रत्येनुसार धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
महालक्ष्मी मंदिर नूतनीकरण झाल्यानुसार गावातील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी, बिघडलेली आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून यात्रेसाठी पुरेसा कालावधी मिळावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. गावकऱ्यांनी विचार मांडल्यानंतर ग्रामस्थ कमिटीने चर्चा करून 2024 साली यात्रा करण्याचा निर्णय घेतला. या आधीची यात्रा 1994 मध्ये आयोजित केली होती. 30 वर्षानंतर होणाऱ्या यात्रेनिमित्त गाऱ्हाणे घालण्यात आले आणि रथ बांधणीला प्रारंभ करण्यात येणार आहे. बैठकीला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.