॥ अलतगा श्री लक्ष्मी यात्रेसाठी कंग्राळी ग्रामपंचायतीकडून सुविधा बाबत दक्षता ॥
यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन
कंग्राळी खुर्द – मंगळवार दिनांक 25 एप्रील पासून सुरु होणारया अलतगा महालक्ष्मी यात्रेसाठी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीकडून विविध सुविधा पुरवून पुर्ण दक्षता घेतली असल्याची माहिती ग्रा.प अध्यक्ष यल्लापा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे . तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे .
यात्रा निमीत्ताने कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या वतीने प्राथमिक सुविधांचा वानवा होणार नाही याची काळजी घेतली असून कचरा व्यवस्थापन , सांडपाणी नियोजन , वाहतुक कोंडी, कोनत्याही प्रकारची तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता ग्राम पंचायतीने घेतली असून तसे नियोजन केले आहे . आज 25 तारखेला अक्षतारोपन होणार त्यानंतर श्री महालक्ष्मी रथावर विराजमान होऊन गावात मिरवणूक काढण्यात येणार आहे . बुधवारी 26 तारखेला महालक्ष्मी गदगेवर बसणार असून 3 मे ला यात्रेची सांगता होणार आहे .
त्यामुळे आज अध्यक्ष यल्लापा पाटील , पीडीओ जी आय . बर्गी, उपाध्यक्षा ज्योती पाटील ,सदस्य प्रशांत पाटील , वैजनाथ बेन्नाळकर व अन्य सदस्यांनी यात्रा कमिटीशी चर्चा करून यात्रा शांततेत पार पाडण्याबाबत सूचना केल्या . तसेच सर्व भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा देऊन यात्रेचा आनंद लुटा पण यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे .