बेळगाव बार असोसिएशन तर्फे शिवबसव जयंती साजरी
बेळगाव: बार असोसिएशन तर्फे रविवार दिनांक 23 रोजी शिवबसव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव येथील वकील समुदाय भवन येथे असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट प्रभू यतनट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश श्री मुस्तफा हुसेन ,उपाध्यक्ष एडवोकेट सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नांवर, सचिव एडवोकेट गिरीराज पाटील ,प्रमुख वक्ते श्री अनिल चौधरी, डॉ शिवानंद जमादार ,निवृत्त सचिव महसूल खाते कर्नाटक राज्य प्राध्यापक श्रीकांत शानवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व जगतज्योती बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी डॉक्टर शिवानंद जमादार यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि जगत ज्योती बसवेश्वर महाराज या दोन्ही महापुरुषांचे आदर्श आपल्या जीवनात अस्मसात करणे गरजेचे आहे .दोन्ही महापुरुषांनी समाजातील जातीभेद,धर्मभेद, नष्ट करण्यासाठी समाजासमोर विचार दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हते तर ते अन्याय विरुद्ध लढले. जर ते भारताबाहेरील देशात जन्मले असते तर संपूर्ण जगावर राज्य केले असते. यावेळी अनिल चौधरी प्रा श्रीकांत शानवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराजांविषयी त्यांच्या कार्याविषयी विचार मांडले.
याप्रसंगी जिल्हा प्रधान न्यायाधीश श्री मुस्तफा हुसेन यांनी दोन्ही महापुरुषांविषयी त्यांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाविषयी व शिकवणी बाबत विचार मांडले. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे बार असोसिएशनच्या मार्फत शाल,श्रीफळ आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव गिरीराज पाटील यांनी केले