लिंगायतांमधेच युद्ध..! तेही इथे
बेळगावात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातही लिंगायत कोणाला पाठिंबा द्यायचा या संभ्रमात आहेत.
कारण सर्वच उमेदवार हे लिंगायतच आहेत .उमेदवार रणधुमाळीत प्रचार करत असताना, बेळगावातील लिंगायत भाजपच्या उमेदवारावर व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोरदार टीका करत आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायतांना तिकीट देण्याचा आग्रह राष्ट्रीय पक्षांनी धरला होता.
त्यानुसार डॉ. रवी पाटील यांना भाजपने तिकीट दिले आहे, तर राजकुमार टोपण्णवार यांना आम आदमी पक्षाने तिकीट जाहीर केले आहे. जेडीएस पक्षाकडून शिवानंद मुगुलिहाळ आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाकडून प्रवीण हिरेमठ हे निवडणूक लढ्याकरिता सज्ज आहेत. यात कोणाला पाठिंबा द्यायचा याची चर्चा बेळगाव लिंगायतांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सुरू आहे.
या ग्रुप मध्ये काही सदस्यांनी संदेश पाठविला आहे तो असा सर्व लिंगायत मते कोणाला मिळावीत हे मोजक्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायचे का? आमच्या संस्थांनी जनतेचा विश्वास कधी जिंकला ते सांगा.
आमच्या संस्थांनी त्यांचे वागणे कसे आहे हे सांगितले तर ते लिंगायत समाजाचे कोण आहेत हे ठरते .तसेच डॉ. रवी पाटील यांनी काल प्रति दुचाकी 500 रुपये का दिले,त्याठिकाणी तरुण किती होते
रवी पाटील यांचे कोणाचे मित्र असतील तर कृपया उत्तर द्या. अशा प्रकारचा संताप त्यांनी व्यक्त केला.