अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज थाटात संपन्न झाले या कार्यक्रमाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर शिवाजी सूंडकर यांच्या हस्ते हित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून युवा कार्यकर्ते भरकटलेले आहेत त्या युवा कार्यकर्त्यांना मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये मराठी भाषा बोलत आहात आणि स्वाभिमानी जगत आहात. तेच जर महाराष्ट्र एकीकरण समिती संपली तर तुम्हाला राष्ट्रीय पक्षांमध्ये नतमस्तक व्हावे लागेल. अजून वेळ गेलेली नाही समितीला पाठिंबा देऊन आणि आपल्या मराठी भाषेसाठी समितीला बहुमताने निवडून आणूया असे अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले.
प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी मालोजी अष्टेकर नगरसेवक शिवाजी मंडोळकर रमाकांत कोंडुस्कर रवी साळुंखे नगरसेविका वैशाली भातकांडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.