बेळगाव शहर आणि परिसरात परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.
बेळगावच्या शिवजयंतीला शंभर वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा आहे.सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे विविध शिवजयंती मंडळांनी महाराष्ट्रातील अनेक गडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले.
त्या नंतर शिवज्योत घेऊन कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रस्थान केले.मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार घालून आरती करण्यात आली.यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी घोषणा दिल्या.यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते,कार्यकर्ते,उमेदवार रमाकांत कोंडुसकर व अमर येळ्ळूरकर यांची उपस्थिती होती.