आर एम चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
समितीवरील आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी जनसागर लोटला
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार आर.एम.चौगुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी समितीवरील आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी जनसागर लोटला होता.
धर्मवारी संभाजी चौक येथे हजारो कार्यकर्ते जमले होते.धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नेते मंडळी आणि कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी निघाले.हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी यामुळे सगळे वातावरण भगवेमय होऊन गेले होते.रस्त्यावर भगवा सागर पसरल्याचे दृश्य यावेळी पाहायला मिळाले.
बेळगाव,कारवार,निपाणी,बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्राने मे नही तो जेलमे,कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.समितीचे उमेदवार आर.एम.चौगुले हे बैलगाडीतून मिरवणुकीत सहभागी झाले होते.