न्यायालयीन आवारात पोस्ट ऑफिसचे उद्घाटन
बेळगाव : पोस्ट ऑफिस हे लोकसेवेसाठी सुरू करण्यात आले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा याच हेतूने न्यायालयीन आवारामध्ये पोस्ट ऑफिस ची सुरुवात करण्यात आली आहे .असे वक्तव्य श्री मुस्तफा हुसेन यांनी ऑफिस उद्घाटनप्रसंगी केले.
न्यायालयीन आवारात पोस्ट ऑफिस व्हावे अशी मागणी अनेक दिवसांपासून वकिलांकडून मागणी होत होती. तर आज न्यायालयीन आवारामध्ये पोस्ट ऑफिसचे उद्घाटन माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री मुस्तफा हुसेन यांच्या अमृत हस्ते उद्घाटन करण्यात आले.
तसेच याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करते वेळी डाक विभागाचे अधिकारी विजया नरसिंहा म्हणाले डाक विभागामध्ये विविध सुविधा उपलब्ध झाल्या असून नागरिकांच्या मागणीनुसार सहकारी संस्थेच्या सहकार्याने पोस्ट ऑफिस न्यायालयीन आवारामध्ये सुरू करण्यात आले आहे.डाक विभाग जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डाकघर उद्घाटन प्रसंगी डाक विभागाचे श्री विजया नरसिंह बारा असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष श्री एस बी चव्हाण ,प्रधान सचिव श्री गिरीश पाटील, सचिन शिवन्नावर, जिल्हा न्यायालयीन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश बुरुडा ,न्यायालयीन कर्मचारी सहकारी संघाचे अध्यक्ष श्री वीरपक्षप्पा निडोणी, कर्मचारी वर्ग,जेष्ठ वकील पत्रकार त्यावेळी उपस्थित होते.