जुनाट विहिरीचे होणार पुनरुज्जीवन
जुन्या अवस्थेतील मृत विहिरीचे पुनरुज्जीवन आणि इंडिपेंडेंस रोड मार्केट स्टेट कॅम्प येथील खुल्या जागेमध्ये नव्या विहिरीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅम्प येथे होणाऱ्या जुन्या विहिरीचे पुनर्जीवन आणि नव्या विहिरीचे बांधकाम नागरिकांना हितावह ठरणार आहे.
पाण्याची समस्या मिटावी याकरिता आकाशगंगा प्रकल्प अंतर्गत कॅम्प येथे ही योजना राबविण्यात येणार आहे तसेच नव्या जागेमध्ये विहिरीचे बांधकाम देखील करण्यात येणार आहे.
नागरिकांना पिण्याची पाण्याची समस्या भासू नये याकरिता ही योजना अमलात आणली आहे. तसेच येणाऱ्या काळात आकाशगंगा प्रकल्पांतर्गत कॅन्टोन्मेंट परिसरात पाच नव्या विहिरीची निर्मिती करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज येथील दोन्ही प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन किरण निपाणीकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. येथील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये त्याचप्रमाणे भूजल पातळी कमी होऊ नये याकरिता संबंधित दोन्ही विहिरींमध्ये पावसाच्या पाण्याची साठवणूक रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे करण्यात येणार आहे.
कॅम्प येथील कोंडाप्पा स्ट्रीट जवळ येईल स्वातंत्र काळातील जुन्या मृत विहिरीचे पुनर्जीवन करून या विहिरीमध्ये असलेला केरकचरा काढून मृता विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
याद्वारे येथील नागरिकांची पाण्याची समस्या मिटणार आहे. पावसाच्या पाण्याद्वारे रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नागरिकांच्या पाण्याची समस्या मिटवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे करण्यात येणार आहे.