मला दुःख झाले पण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे
माझ्या पक्षाने वैयक्तिकरित्या माझ्यावर अन्याय केला आहे. मात्र मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे मत उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मला दुःख झाले आहे. तसेच माझ्यावर अन्याय झाला आहे मात्र असे असले तरी मी पक्ष सोडणार नाही.
भाजप हाय कमांडने या क्षेत्रात सध्या बदल केला आहे आणि त्यानी डॉक्टर रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे आम्ही सर्वजण एकजुटीने काम करून त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेऊ असे सांगितले.
डॉक्टर रवी पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेल्या पासून प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.मात्र मी माझ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
पक्षाने दोन वेळा माझी उमेदवारी सुद्धा नाकारली मात्र मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे असे मत यावेळी आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी या पत्रकार परिषदेचे डॉक्टर रवी पाटील यांना निवडून देणार असल्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला असल्याचे सांगितले.