राष्ट्रीय मराठा पार्टी लढविणार 50 जागांवर निवडणूक
आज कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष श्री अंकुशराव शिवाजीराव पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या कर्नाटका विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीलाला हमीभाव, अतिर्वष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तुर ईतर पिकाचे नुकसान झाले आहे कर्नाटक सरकारने तोकडी मदत केली आहे. पिक विमा भरलेल्या पिकांचे आर्थिक नुकसान अद्याप प्राप्त झाले नाही. कोरोना काळात लाखों कामगार बेरोजगार झाले आहेत. सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. अनेक खेडेगावात डांबरीकरण झाले नसल्याने वाहतुकीसाठी गैरसोय होत असुन शुध्द फिल्टर पाणी खेडेगावात उपलब्ध नसल्याने मुतखडा होवुन अनेक रुग्ण त्रस्त आहेत.
ग्रामीण भागात रुग्णालय उपलब्ध नाहीत म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टी च्या वतीने अर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग विद्यार्थी यांना वस्तीग्रह, सामुहिक विवाह सोहळा साठी मंगल कार्यालय, रुग्णालय, अंबलन्य,कोशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यातील मराठी सिमार्वती मराठी भाषीक भागात मराठी शाळा बंद करुन कन्नड भाषा कर्नाटक शक्तीची करुन मराठी भाषिक अनाडी करून मराठी भाषिकावर अन्याय होत आहे.
शेतकऱ्यांच्या सातबारावर कन्नड व इंग्रजी भाषेत सातबारावर असल्याने मराठीत नसल्याने डोळे असुन अंधळ्यासारखे झाले आहेत केवळ मराठी भाषीक एकत्र नसल्याने विविध पक्षाला मतदान केल्याने कर्नाटक विधानसभा सभ आमदार नसल्याने शासन दरबारी अनेक विकासाची कामे होत नाहीत मराठी भाषीकाना स्वताचा पक्ष नव्हता म्हणून इतर विविध पक्षास मतदान करावे लागत होते मराठी भाषिक बहुसंख्येने असुनही मताची विभागणी होऊन मराठी भाषिकाचे आवाज कर्नाटक विधानसभा उठत नव्हता.
भारत निर्वाचन आयोग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय मराठा पार्टी ला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याने आपल्या हक्कासाठी राष्ट्रीय मराठा पार्टी आपले प्रश्न कर्नाटक विधानसभा मध्ये प्रश्न उपस्थित करण्याठी आपण मतदार बंधु भगिणीचे प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक प्रश्न कर्नाटक विधानसभेत आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात 50 उमेदवार उभे करणार आहेत तरी इच्छुक विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय मराठा पार्टी ओबीसी सेल राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय रमनकाटे, कर्नाटक प्रभारी शार्दुल तोडकर, अनुसूचित जाती सेल कर्नाटक प्रदेश अध्यक्ष सुहास हिरेमनी, बेळगाव संपर्क प्रमुख शिवदास सामशे पाटील यांच्याशी संपर्क साधुन उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारी अर्ज व आपण मतदारसंघात केलेल्या कामाचा उल्लेख करावा. असे आवाहन राष्ट्रीय मराठा पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी कर्नाटक प्रभारी शार्दुल तोडकर अनुसूचित जाती सेल कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सुहास हिरेमनी बेळगाव संपर्कप्रमुख शिवदास सामसे पाटील डॉक्टर सागर खांडेकर प्रकाश भापकर यावेळी उपस्थित होते.