महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी क्लासेसची सोय
महिलांनी स्वावलंबी व्हावे याकरिता जय जवान किसान ग्रुप वेल्फेअर सोसायटी कर्नाटक राज्य रजिस्ट्रेशन एनजीओ बेळगाव जिल्हा यांनी टेलरिंग क्लास करिता शिलाई मशीन देऊ केले तसेच कॉम्प्युटर क्लास ची सोय करून देऊन मदतीचा हात पुढे केला.
महिलांनी स्वतः शिकून मोठे व्हावे याकरिता त्यांच्यासाठी विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार बैलूर येथील गावात महिलांकरिता शिलाई मशीन क्लास आणि कम्प्युटर क्लासच्या क्लासचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रम बैलूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके आणि सेक्रेटरी मिलन पवार उपस्थित होत्या यावेळी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
लक्ष्मी फोटो पूजन करून फीत कापून क्लासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला जय जवान किसान ग्रुप वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष गोविंद पाटील सामाजिक कार्यकर्त्या अक्काताई सुतार यांच्यासह बैलूर गावातील महिला उपस्थित होत्या.