समितीच्या ग्रामीण मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी 5 जणांनी केला अर्ज
महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आज अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे ही संधी साधत जवळपास ग्रामीण मतदार संघामधून विधानसभा निवडणूक लढवीविनाकारिता पाच जण इच्छुक आहेत .
यामध्ये सुधीर चव्हाण माजी महापौर शिवाजी सुंठकर आर आय पाटील आर एम चौगुले रामचंद्र मोदगेकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती मधून ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आत्ता ग्रामीण मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या पाच वर पोहोचली आहे.
आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले. वकील सुधीर चव्हाण हे महाराष्ट्र एकीकरण समितीची बांधील असून त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून समितीच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी देखील समिती मधून आणि कार्य केले आहे. मध्यस्थी त्यांनी समितीला दुसऱ्या दिला होता मात्र आता त्यांनी पुन्हा समितीची वाढ धरली आहे.
तसेच ग्रामीण मतदार संघात तरुणांचे संघटन करण्यासाठी युवा नेते आर एम चौगुले हेदेखील प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आणि आता या निवडणुकीच्या शर्यतीत रामचंद्र मोदगेकर यांनी देखील आपले अजून नशीब आजमावण्याकरिता प्रयत्न चालू ठेवले आहेत.
एकूण पाच उमेदवारांनी ग्रामीण मतदार संघात निवडणुकीत अर्ज सादर केला असून यामध्ये कुणाला उमेदवारी जाहीर केली जाणार याकडे सीमावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.