बेळगाव बार असोसिएशन मध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
बेळगाव: आपल्या देशाच्या संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार म्हणजेच सर्व नागरिकांना जीवन जगण्याचा अधिकार ,समानता, सत्य ,शांती ,अहिंसा हे सर्व अधिकार भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानातून आले आहेत. आणि आज संपूर्ण जगाला भगवान महावीर यांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाची गरज आहे. असे उगार कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एम वाय अरुण यांनी काढले.
आज रोजी बेळगाव बारा असोसिएशनच्या वतीने महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगीचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील प्रभू यतनट्टी होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वकील सुधीर चव्हाण ,सचिव गिरीराज पाटील ,जिल्हा न्यायाधीश श्री हरीषा, न्यायमूर्तीच्या सुविध पत्नी ज्येष्ठ वकील डी .जे गंगाई उपस्थित होते.
न्यायमूर्तींच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.आय अरुण यांचा बार असोसिएशनच्या वतीने शाल व श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव न्यायालयातील अनेक न्यायाधीश उपस्थित होते .तसेच बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सहसचिव बंटी कपाही महानतेश पाटील ,प्रभाकर पवार ,आदर्श पाटील ,अभिषेक उद्देशी, एस.ए.पाटील, रमेश मिसाळे व इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते