विविध मागण्यासाठी माजी सैनिकांनी छेडले आंदोलन
माजी सैनिक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी देशातील जवानांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्याबरोबरच आपल्या विविध मागण्या मान्य केल्या जाव्यात अशी मागणी केली. यावेळी त्यांनी सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना दिले.
यावेळी माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी केंद्र सरकार जवानांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या तात्काळ मान्य आणि जवानांना न्याय द्यावा अशी मागणी केली.
त्याचबरोबर पेन्शन सुविधा देण्याच्या बाबतीत जवानांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली तसेच याबाबत निवेदनात संपूर्ण आपल्या मागण्या नमूद केल्या.
यावेळी माजी सैनिक संघटनेने जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी सैनिक संघटना ही बेळगाव जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून संघर्ष करत असल्याचे सांगितले अथनी चिकोडी ,खानापूर ,सौंदत्ती ,रामदुर्ग ,बैलहोगाल, गोकाक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देशाच्या संरक्षण दलाचे सेवानिवृत्त जवान या संघटनेमध्ये सदस्य असल्याचे सांगितले.
तसेच जेव्हापासून देश स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून जवानांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी माजी सैनिक संघटनेने केला. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभेदार के बी नौकुडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सेवानिवृत्त जवानांनी आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना दिले.