आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
एका पेंटरने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना कडोली येथे घडली असून पेंटर ने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
बिराप्पा केंपाणा पुजारी वय 42 असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने कर्जाला कंटाळून दारूचे नशेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कर्जबाजारी झाल्याने मानसिक निराशेतून त्याने हे कृत्य केले आहे. घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली असून त्याचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टम साठी सिविल हॉस्पिटलला पाठवून देण्यात आला आहे तसेच त्याच्यावर त्याच्या मूळ गावी म्हणजेच बुगडीकट्टटी येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.