दहावीच्या विद्यार्थ्यांना फुले देऊन शुभेच्छा
शुक्रवार. दिनांक ३१ मार्च २०२३ पासून इयत्ता दहावी (एसएसएलसी) परीक्षेस प्रारंभ झाला. या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘समस्त नामदेव दैवकी संस्था,खडेबाजार, बेळगांव’ यांचेवतीने स्वागत आणि शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. “विद्यार्थी हा मूळ परीक्षार्थी नसून तो एक सुजाण देशाचा नागरिक असतो” म्हणूनच, परीक्षेकडे गुणवत्ता म्हणून पाहिले जावे यासाठी केलेला समाज बांधवानी हा प्रयत्न होता. या उपक्रमामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भेटले.
बेळगांव शहरातील बेनस्मिथ हायस्कूल आणि सेंट झेवियर्स हायस्कूल या प्रमुख परीक्षा केंद्रांवर समाज बांधवानी प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून ‘एसएसएलसी’ परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या दरम्यान मराठी विद्यानिकेतन बेळगांवच्या शिक्षिका सविता पवार (मॅडम) आणि बी एम पाटील (सर) यांनी ही या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला होता. यावेळी अजित कोकणे, अशोक रेळेकर, सुरेश पिसे, प्रमोद काकडे, निरंजन बोगांळे, सुहास खटावकर, महेश खटावकर, रविकांत पिसे, विशाल वंडकर आदी कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते.