केएलएस जीआयटी सिम्बव 23 – राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सवात जनरल चॅम्पियन बनला
23 ते 26 2023 मार्च या कालावधीत सिम्बायोसिस लॉ कॉलेज, पुणे येथे आयोजित केलेल्या ‘सिम्बव’23 मध्ये केएलएस जीआयटी बेलागावीच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक संघांनी भाग घेतला. आणि ह्या सांस्कृतिक उत्सव मध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. केएलएस जीआयटी ला सर्वोत्कृष्ट सहभागी संस्था म्हणून आणि फेस्टचे जनरल चॅम्पियन घोषित करण्यात आले साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, ई- गेमिंग, फोटोग्राफी, प्रश्नमंजुषा, फॅशन आणि ललित कला अशा विविध विभागांतर्गत बीई आणि एमबीए पदवीच्या 60 विध्यार्थी या उत्सवात भाग घेतले होते .
मंदिरा केसरकर फेस पेंटिंगमध्ये उपविजेते, नवनीत पोस्टर मेकिंगमध्ये उपविजेते, श्रेयश पाटील, रक्षिता पाटील, अभिषेक सोनार, सोनिया जाधव, सुशांत, रजत हेगडे, श्रेयस मलगली, श्रीनिधी हुक्केरी, आयमन बागबान गौतमी टीपी, अनीशा चौधरी, अमेय भातखंडे यांचा समावेश असलेल्या टीम फॅशन स्पर्धेचे विजेते.
पियुष ऐराणी – स्पीकिंग ट्रीमध्ये विजेते, निश्चलगौडा पाटील स्पीकिंग ट्रीमध्ये उपविजेते, वैष्णवी कुलकर्णी, पुनीत जोशी आणि आश्रुषा डम्ब शराडस मध्ये उपविजेते, पियुष ऐरानी आणि निश्चलगौडा पाटील – वर्ड गेम्समध्ये विजेते, मंदिरा केसरकर आणि आयमन बागबान आर्ट-ई-फॅक्ट्समध्ये विजेते, – जतीन मुळगुंड – मनोरंजन प्रश्नमंजुषामध्ये उपविजेते, नामीत कराडी बिझटेक क्विझमधील विजेते, – नामीत कराडी आणि अविनाश जनरल क्विझमध्ये विजेते, जतीन मुळागुंड आणि रमन बेळगुंडी – जनरल क्विझमध्ये उपविजेते, निश्चलगौडा पाटील शिपरेकमध्ये उपविजेते पारितोषिक फटकावले –
सांस्कृतिक सेक्रेटरी, प्रा. पूर्वा अध्यापक, सांस्कृतिक समितीचे प्राध्यापक समन्वयक यांनी विद्यार्थी संघांना सहकार्य केले. डीन विद्यार्थी व्यवहार प्रा. सतीश पी. देशपांडे प्राचार्य प्रा. डी. ए. कुलकर्णी, श्री. राम भंडारे 1 श्री. राजेंद्र बेळगावकर, अध्यक्ष जीसी जीआयटी, आणि सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थेला गौरव मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण सांस्कृतिक संघाचे अभिनंदन केले आहे आणि विद्यार्थ्यांच्या विविध कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.