विद्याभारती जिल्हाध्यक्षपदी माधव पुणेकर, सचिवपदी सुभाष कुलकर्णी यांची निवड.
बेळगाव ता,26. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात शनिवारी ता 25 रोजी विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेची वार्षिक बैठक उत्साहात पार पडली. संघटनेच्या नुतन अध्यक्षपदी माधव पुणेकर, तर सचिवपदी सुभाष कुलकर्णी यांची एकमतानी निवड करण्यात आली.
या विद्याभारती जिल्हास्तरीय बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती दक्षिण मध्यक्षेत्र प्रमुख वसंत माधव, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, मावळते अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, विज्ञान प्रमुख व्ही एस होंनुंगुर , ऋतुजा जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, स्वागत सुजाता दप्तरदार यांनी केले, विद्याभारती वार्षिक अहवालवाचन सीमा कामत,तर प्रेमा मेलीणमनी यांनी जमाखर्च सादर केला, यानंतर विविध विषयप्रमुख चंद्रकांत पाटील, सरोजा कटगेरी, तिलोतिमा गोमास्ते यांनी वर्षभरातील जिल्हास्तरीय विद्याभारतीच्या विविध संस्कृतज्ञान परीक्षा, क्रिडा विज्ञान,शिशुवाटिका याचा अहवाल सादर केला, परमेश्वर हेगडे वसंत माधव यांनी वर्षभरातील प्रांत, क्षेत्रीय,व राष्ट्रीयस्तरावरील विद्याभारतीच्या कार्याच्या आढावा घेतला व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले, तसेच आगामी 2023 24 वर्षात विद्याभारतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच जास्तीत जास्त शाळा विद्याभारतीशी जोडण्यासाठी जिल्हा कमिटीने प्रयत्न करण्याचे आव्हान राज्य संघटनेच्यावतीने करण्यात आले.
यानंतर सन 2023- 24 सालाकरिता विद्याभारती बेळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष माधव पुणेकर ,उपाध्यक्ष रामनाथ नाईक, सचिव रामनाथ नाईक, क्रीडाप्रमुख चंद्रकांत पाटील, विज्ञान प्रमुख व्ही एस वन्गुंल, शिशुवाटिका प्रमुख सीमा कामत ,संस्कृत प्रमुख सरोजिनी कटेगिरी, मातृभारती प्रमुख तिलोतिमा गुमास्ते यांची निवड करण्यात आली.या बैठकीला संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल गणेशपुर, गोपाळ जीनगौडा स्कूल शिंदोळी,हनिवेल इंग्रजी स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर ,रामदुर्ग हुक्केरी,कुरणी ,गोकाक शाळेचे व्यवस्थापन सदस्य मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुजाता दफ्तरदार यांनी मानले.