मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
युवा वकिलाला मारहाण केल्याच्या संदर्भात आज वकिलांनी रास्ता रोको करून आंदोलन छेडले आणि जे एम एस सी कोर्ट समोर रस्त्यावर जमून निदर्शने केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की मूळचे रामदुर्ग व सध्या बेळगाव आत वकिली करणारे वकील इराण्णा पुजारी आपल्या पत्नीला दवाखान्यात ऍडमिट करिता घेऊन गेले होते यावेळी त्यांनी आपले वाहन स्टेशनच्या मागे लावून काही वेळात येतो असे सांगितले.
या ठिकाणी असलेल्या एका महिला पोलीसने आक्षेप घेतला आणि युवा वकिलाच्या अंगावर गेली यावेळी तिच्या समावेत असलेले दोन पुरुष पोलिसांनी देखील पुजारी यांना पकडून केली.
त्यामुळे संताप्त झालेल्या वकिलांनी सर्व प्रकार आपल्या वकील मित्रांना सांगितला. यावेळी सर्व वकिलांनी एकत्रित येत रास्ता रोको केला आणि जे एम एफ सी कोर्ट समोर एकत्रित जमून निदर्शने केली.
यावेळी वकिलांनी केलेल्या रास्ता रोको मुळे वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्या होत्या. तसेच त्यावर वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली होती.