मे मध्ये होणार बेळगावत शिवगर्जना महानाट्य
डॉ. रवी पाटील यांनी शिवगर्जना हे महानाट्य आयोजित केले आहे. काही कारणास्तव शहरात होणारे शिवगर्जना हे महानाट्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार असल्याकारणाने पुढे ढकलण्यात आले आहे.
शिवगर्जना हे महानाट्य पाहण्याकरिता सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या असून सर्व शिवभक्तांना आणि बेळगावकरांना शिवगर्जना हे महानाट्य पाहण्याकरिता आपण उपलब्ध करून देणार असा विश्वास डॉक्टर रवी पाटील यांनी दाखविला आहे.
त्यामुळे मे महिन्यात 19, 20 आणि 21 रोजी असे तीन दिवस बेळगावकरांना शिवगर्जना हे महानाट्य पाहण्याची संधी मिळणार आहे. हे महानाट्य कुठे होईल याची माहिती लवकरच प्रसिद्धी पत्रिका द्वारे देण्यात येईल अशी माहिती डॉ रवी पाटील यांनी दिली आहे.