वक्फ बोर्ड कायदा रहित करा
वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावे यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू संघटनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले .
येथील कोर्ट कंपाऊंड, डी सी ऑफिस, समोर पार पडले यावेळी हिंदू जागृतीचे सदस्य म्हणाले की वर्ष 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता.
स्वातंत्र्यानंतरही मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करत ‘वक्फ बोर्डा’ला पाशवी अधिकार दिले. वर्ष 1995 आणि वर्ष 2013 मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्व धर्मीयांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचे अत्यंत भयानक अधिकार वक्फ बोर्डाला दिले.
या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलनाद्वारे केली .