*जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना आता करता येणार मतदान टपालद्वारे*
80 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना आता मतदान टपालद्वारे करता येणार आहे. अशा व्यक्तींकरिता घरातूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी निलेश पाटील यांनी दिली आहे. तसेच यासंबंधी त्यांनी कशाप्रकारे मतदान प्रक्रिया पूर्ण होईल याबद्दल देखील माहिती दिली आहे.
ऐच्छिक टपाल पत्रिका मिळालेल्या मतदारांना केंद्रावर जाऊन मतदान करण्यास परवानगी नसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच त्यांनी टपाल मत अशी नोंद प्रशासनाकडे झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे एक पथक संबंधितांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्याची संधी देईल.
दोन मत अधिकारी मायक्रो अब्जवर पोलीस अधिकारी आणि एक छायाचित्रकार अशा पाच जणांचा समावेश असल्याचे सांगितले आहे.
तसेच संबंधित मतदारांना एसएमएस द्वारे आगाव कल्पना देऊन असते त्यांच्या घरी जाणार आहेत तेथे पोहोचल्यानंतर ओळखपत्र अनेक कागदपत्रांची तपासणी करून मतदानाची संधी ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग व्यक्तींना देणार असल्याचे जिल्हाधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टपाल मतपत्रिका वितरण मतदान आणि प्रक्रिया संबंधी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर आणि ही माहिती दिली आहे.
तसेच टपालाद्वारे मतदानाची गुप्तता काटेकोर पणे पाळावी. कोणताही कारणाने मतदान प्रक्रिया उघड होणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याबरोबरच संपूर्ण मतदान प्रक्रियेचा व्हिडिओ तयार करावा अशा सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना केले आहेत