राजहंस गडावर नागरिकांना प्रवेश बंदी – काय आहे कारण
आज पासून चार मे पर्यंत राजहंस गडावर जनतेला तात्पुरती प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.या संदर्भाचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजाविला आहे.
राजकीय पक्षांनी राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोन वेळा केलेले अनावरण आणि त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झालेला दुग्धाभिषेक सोहळा यानंतर राजहंस गडावर जनतेला जाण्याकरिता बंदी घालण्यात आली आहे.
ही बंदी राजहंस गडावर चाललेल्या विकास कामा संदर्भात घालण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
राजहंस गडावरील विकास होणे अद्याप बाकी आहे. मात्र घाई गडबड करून या ठिकाणी जो अनावरण सोहळा उरकण्यात आला.त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत.
त्याचबरोबर ही कामे चालू असताना नागरिकांमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये.याकरिता आता नागरिकांना गडावर जाण्याकरिता प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजाविला असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.