धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 334 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहण्यात आली श्रद्धांजली
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेले संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. यानिमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 334व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.
पकडल्या गेल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांना त्या क्रूरकर्मा औरंगजेबाने फंदफितुरी ने पकडून अनेक नरक यातना, यमयातना दिल्या. पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यंत कुर्हाडीने तुकडे तुकडे करून अत्यंत हाल हाल करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांची अंत्ययात्रा ही निघाली नाही. इतके दाहक आणि दिव्य बलिदान त्यांचे आहे. हे त्यांचे बलिदान अखंड हिंदू समाजासाठी आहे.
याची जाणीव प्रत्येक हिंदू समाजाला रहावी म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकपदयात्रा काढली जाते. आणि संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी दिला जातो. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन कर्नाटक प्रांत प्रमुख किरणबापू गावडे व वडगाव विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. शंकर भातकांडे यांच्या हस्ते ज्वालेच्या मुकपदयात्रेला सुरुवात झाली.
ही मुकपदयात्रा एस पी एम रोड, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, टिळक चौक येथून निघून रामलिंग खिंड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विविध तऱ्हेचा अभिषेक घालण्यात आला. जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून, मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले. तसेच त्यांना मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतीकात्मक चितेचे दहन करण्यात आले. या चितेला अग्नी देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथून ज्वाला प्रज्वलित करून आणली होती.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख श्री किरण गावडे यांनी धारकर्यांना मार्गदर्शन केले तसेच या परिसराला “श्री शंभूतीर्थ” असे नामकरण करण्यात आले. वक्ते म्हणून प्रचारक तथा कणबर्गी विभाग प्रमुख हिरामनी मुचंडीकर यांनी धर्मवीर बलिदान का पाळावा तसेच आजचा हिंदुसमाज या विषयावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित शिवभक्तांना भारावून सोडले. गजानन निलजकर यांनी सर्व धारकर्यांना भारत मातेची प्रतिज्ञा देण्यात आली. या संपूर्ण विधीचे पौराहित्य छत्रे गुरुजी यांनी केले. शेवटी ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावर्षी तब्बल 145 विभागात ज्वाला देण्यात आली. यात संपूर्ण तालुका तसेच सिंधुदुर्ग, डिचोली,दोडा मार्ग या भागात ही ज्वाला पोहचली. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील,तालुका प्रमुख परशराम कोकितकर, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाणाचे, अमोल केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, उदित रेगे, गजानन पाटील, गजानन पवार,अभिषेक निलजकर, रामकृष्ण सुतार,गिरीश खंनुकर, जोतिबा चोपडे, वैभव धमनेकर, युवराज पाटील, अंकुश केसरकर, प्रसाद बचोळकर,भास्कर पाटील, छत्रे गुरुजी, मोहन ओक, चैतन्य छत्रे, शंकर भातखंडे,विजय कुंटे, बाळू सांगूकर,महेश गावडे,संकेत सुतार,प्रफुल्ल शिरवलकर,प्रमिला पाटील,सुलोचना शिनोळकर, गौरी गवाने,मिथिला पाटील तसेच शेकडो धारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.