अपघातात पोलिसांनी हळूच काढता पाय घेतला
पोलिसांनी अडवल्यामुळे झालेल्या अपघातात पोलिसांनी हळूच काढता पाय घेतला आणि दंड वसूल करण्याकरिता जागा बदलली. याबाबत मिळालेली माहिती अशी की वाहतूक नियम दंड वसूल च्या नावाखाली रहदारी वाहतूक पोलीस एका मंदिराच्या मागे थांबून दंड वसूल करत होते
अचानक त्यांनी एका दुचाकीला अडवले यावेळी दुचाकी वर एक युवती होती अचानक हा प्रकार घडले असल्याने तिने ब्रेक लावला आणि ती दुचाकीवरून खाली पडली यावेळी दुचाकी स्वार आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली
एसपीएम रोड जवळील बसवान मंदिर जवळ हा प्रकार घडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या मध्यस्थीने हा प्रकार निवळला. नंतर वाहतूक पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी पुढे जाऊन दंड वसूल करण्याकरिता उभे राहण्याची विनंती केली.
यावेळी वादावादी झाली असल्याने वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील दंड वसूल बंद करून आपला काढता पाय घेतला असल्याचे दिसून आले.