साहेब तुमचे लक्ष कुठे ? पाहता का इकडे
देशपांडे गल्ली येथे रस्त्याचे काम करण्याकरिता गेल्या अनेक महिन्यां अगोदर शुभारंभ करण्यात आला.मात्र येथील रस्ता खोदाई करून तसाच ठेवण्यात आल्याने नागरिकांनी आज रास्ता रोको करून आंदोलन छेडले.
आणि जोपर्यंत आता पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिला. उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी इलेक्शन येणार असल्याने आधीच शहरातील विकास कामांचा शुभारंभ केला.
या कामात त्यांनी आधीच सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर डांबर घातले.मात्र दुरावस्थेत असलेल्या रस्त्याकडे त्यांचा कानाडोळा झाला असल्याने आज नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले.
चार-पाच महिन्याआधी रस्त्याचा शुभारंभ झाला आणि निधी देखील मंजूर झाला. मात्र हा निधी देखील आमदाराने लाटला आहे की का असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.
निवडणुका तोंडावर येत असल्याने आपण शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करून दाखवली आहेत.असा संभ्रम आमदार नागरिकांच्या मनामध्ये निर्माण करत आहे. मात्र वास्तविक पाहता शहरातील गटारी रस्ते ड्रेनेज समस्या पाणी समस्या अजूनही जैसे थे आहे.
आमदारांनी आपल्या घरी अनेक कार्यालयात बसण्याऐवजी तसेच अनेक अतिथींना भेटून त्यांना लोणी लावण्या ऐवजी शहरातील जर अर्धवट राहिलेली कामे पूर्ण केली तर बरे होईल. असे नागरिकांमधून सध्या बोलले जात आहे.
त्यातच देशपांडे गल्लीत पाणी समस्या ड्रेनेज समस्या रस्त्याच्या समस्येने डोके वर काढले असून आमदाराला येणाऱ्या काळात निवडून द्यावे का? का अन्य कोणत्या उमेदवाराला पुढे करून शहरातील विकास कामे पूर्ण करून घ्यावेत असा प्रश्न आता नागरिक एकमेकांना विचारत आहेत.