शिवचरित्राचे लोकार्पण मोठ्या उत्साहात
बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या शिवचरित्राचे लोकार्पण आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.विजापूरचे बसनगौडा पाटील यतनाळ ,मराठा प्राधिकारचे अध्यक्ष मारुती मुळ्ये यांच्यासह विविध मान्यवर आणि हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती.
संपूर्ण परिसरात भगव्या पताका,भगवे ध्वज लावल्यामुळे सगळे वातावरण शिवमय झाले होते.झांज पथकाने देखील यावेळी सादरीकरण करून मान्यवरांच्या सह उपस्थितांची मने जिंकली.छत्रपती शिवाजी उद्यानात शिवचरित्र उभारण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.शिवचरित्रात महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक पर्यंतचे प्रसंग पाहायला मिळतात.
शिवजन्म सोहळा,अफजल वध,राज्याभिषेक सोहळा हे शिवचरित्राला भेट देणाऱ्यांची चे आकर्षण ठरणार आहे.याशिवाय वॉटर स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग दाखवण्यात येणार आहेत.वॉटर स्क्रीन वरचा हा भारतातील पहिला प्रयोग आहे .