पाण्यासाठी अनगोळ रहिवासांनी पुकारला एल्गार
शहराला सध्या पाणीपुरवठ्यात व्यक्त येत असल्याने अनगोळ येथील रहिवाशांनी एल्गार पुकारला आहे. अनगोळ परिसराला पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याचा निषेधार्थ स्थानिक महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन केले आहे आणि एल अँड टी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपल्याला पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावा अशी मागणी केली आहे.
शहराच्या काही भागात पाण्याची समस्या डोकेदुखी बनली आहे पंधरा दिवसात पिण्याचे पाणी येत असल्याने नागरिकांना सध्या पाणी विकत आणावे लागत आहे
पाणीपट्टी भरून देखील आपल्याला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी निदर्शने करत आंदोलन छेडले आहे तसेच आपल्याला सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे.
अनगोळ भागात दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र बंदी आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना पाणी आणण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. तसेच पंधरा दिवसांनी जो पाणीपुरवठा करणार येतो त्याचाही पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना पाणी भरताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे आपल्याला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी अनगोळ परिसरातील महिलांनी निदर्शनाद्वारे केले आहे