आमिषे देताय थांबा – ही बातमी वाचाच
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पैसे कुकर साडी भांडी यासह कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू जर उमेदवार मतदारांना देत असल्याचे समजताच त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जनतेची दिशाभूल करून त्यांना कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवायचे नाही. जर असे झाल्यास कडक उपाययोजना करण्याचे निर्देश निवडणूक आयुक्तांनी दिले असल्याचे सांगितले आहे.
निवडणुकीच्या काळात घरगुती भांडी साड्या कुकर त्याचबरोबर इतर अनेक साहित्य भेटवस्तू वाटप करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. जर असे आढळून आल्यास त्या वस्तू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले आहे.
जर याचे पालन कोणीही न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निवडणूक आयोगाने उचलले गेलेल्या उपाययोजनांबाबत निदर्शनाचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही म्हटले आहे