*एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा*
एंजल फाउंडेशन च्या वतीने छत्रेवाडा सभागृहात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना एक विरुंगला मिळावा याकरिता प्रारंभी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला होत्या यावेळी अनेक महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक जिंकले.
यावेळी पास दि ॲक्शन हा गेम खेळताना सर्वच महिलांनी मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कॅम्प पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक ए रुक्मिणी, कर्नाटक ग्रामीण विकास बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापक नमिता सांगवीकर, जेटकिंगच्या संचालिका रत्ना कुलकर्णी हिंदू जनजागृतीच्या प्रवक्ता उज्वला गावडे उपस्थित होत्या.
तर व्यासपीठावर एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके आणि अध्यक्षा मोलीष्का पवार उपस्थित होत्या यावेळी अध्यक्षांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि फळे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना अनेक मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले आणि कोणतीही मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी महिलांना केले.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात मीनाताई बेनके यांनी महिलांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे असे सांगितले. महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे त्याकरिता त्यांनी वेगवेगळे काम हाती घेतले पाहिजे आणि हे काम हाती घेऊन पूर्ण केले पाहिजे या कामात कोणताही अडथळा येऊ नये याकरिता त्यांना कर्ज सुलभ मिळावे याकरिता आम्ही या कार्यक्रमात कर्नाटक ग्रामीण विकास बँकेच्या व्यवस्थापकांना बोलावलं आहे त्यांची आणि तुमची ओळख व्हावी आणि तुम्ही याच्या माध्यमातून आपले सर्व काम साध्य करावे असे सांगितले.
त्यानंतर समाजात काम करत असणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती हालाखीची असून देखील आपल्या कुटुंबाची देखभाल अत्यंत उत्तमरीत्या करून आपल्या मुलांना शिक्षणात उच्चस्तरावर घेऊन गेलेल्या महिलांचा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या अक्काताई सुतार सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा शिंदे व्यावसायिक महिला राणी यलनगौडा, पत्रकार अक्षता नाईक , नंदन मकळ धामच्या कस्तुरी बंगेर, शुभांगी पेडणेकर नागरत्ना जाधव माधवी मुरकुटे सुमेधा परमेकर सुरेखा लोहार सविता कोरडे साडी शाल प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचे ना देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महिलांमधील कलागुण बाहेर यावेत याकरिता या ठिकाणी नृत्य गाणे उखाणे यासारख्या अनेक स्पर्धा पार पडल्या यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता नाईक देसाई यांनी केले. तर आभार एंजल फाउंडेशनच्या सेक्रेटरी मिलन पवार यांनी मानले.