*वेळ आता पायातील हातात घेण्याची*
बेळगावच्या नागरिकांमध्ये खूप सहनशीलता आहे. शहरात पाण्याच्या पिण्याची व्यवस्था होत नसली तरी ते सर्वजण गप्प आहेत. मात्र त्यांचे हे गप्प रहाणे आता सर्वांना महागात पडणार असल्याचे मत माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केले ते एका खाजगी पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले एकंदरीत शहरातील सध्याची पाणीटंचाई पाहता आता पायातले हातात घेण्याची वेळ आली आहे असे परखड मत व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांनी महानगरपालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल झालेल्या चुकी पत्रकार परिषदेत सांगितल्या .
यावेळी ते म्हणाले की महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर झालेला हा संपूर्णतः चुकीचा आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसताना त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला तरी कसा.
नियमानुसार मार्च अखेर जानेवारी 15 पूर्वी महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प कर स्थायी समितीच्या चेअरमन कडे दिला पाहिजे तसेच त्यानंतर चेअरमनने फेब्रुवारी 18 पूर्वी तो अर्थसंकल्प संमत करून सभागृहाकडे पाठविला पाहिजे मात्र महानगरपालिकेने सादर केलेल्या हा अर्थसंकल्प यामध्ये या कोणत्याही गोष्टी दिसून आल्या नाहीत.
अर्थसंकल्प सादर करण्याकरिता ची अकाउंट ऑफिसर यांची मान्यता लागते मात्र हे काहीही न करता त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि तो पूर्णतः चुकीचा आहे. तसेच शहरात तीनदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार यांनी सुद्धा याकडे जाणून बसून दुर्लक्ष केले आहे.
त्याचबरोबर महापालिका बैठकीचे वृत्तांकन करण्यास मनपा आयुक्तांनी पत्रकारांना देखील मज्जाव केला. महापालिकेची सत्ता ही महापौरांच्या हातात असते पत्रकारांना बोलवण्याचा अधिकार हा महापौरांना आहे.
असे त्यांनी सांगितले आणि यंदाचा महानगरपालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्णतः चुकीचा आहे असे मत मांडले.