*बलून सापडल्याने गोंधळ*
बैलहोंगल तालुक्यातील गद्दी कर विन कोप गावात गुरुवारी सकाळी एक बलून आढळल्याने तेथील लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.लोकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी शेतात जाऊन बलून ताब्यात घेऊन त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
पोलिसांनी बलूनची तपासणी केली.तापमान,वाऱ्याचा वेग,आर्द्रता तपासण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी हा बलून सोडण्यात आला असून बलून सोडलेल्या संस्थेशी देखील पोलिसांनी संपर्क साधून माहिती दिली.
लोकांनी घाबरण्याचे कारण नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या बलू नला इलेक्ट्रॉनिक वस्तू जोडण्यात आल्याने नक्की काय आहे याविषयी लोकात भीती निर्माण झाली होती.