बारावीच्या परीक्षेला आजपासून झाला प्रारंभ
कर्नाटकातील बारावीच्या परीक्षेला गुरुवार पासून प्रारंभ झाला. २९ मार्च पर्यंत बारावीची परीक्षा चालणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील एकूण २५ हजार ३९० विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.परीक्षेला हिजाब घालून येण्यास परवानगी नसून गणवेश सक्तीचा असल्याचे शिक्षण मंत्री बी.एस.नागेश यांनी जाहीर केले आहे.बारावीच्या परीक्षेला जाण्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने मोफत बस सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील ४२ परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही ची नजर असणार आहे.परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.परीक्षा केंद्राच्या प्रवेश द्वारावर हॉल तिकीट तपासून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून पदवी पूर्व शिक्षण खात्याने खबरदारी घेतली आहे.भरारी पथकांची नेमणूक परीक्षेसाठी करण्यात आली आहे.