25 व्या राष्ट्रीय मूकबधिर वरिष्ठ क्रीडा स्पर्धेत बेळगावचा जलतरणपटू घेणार सहभाग
२५ वी ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ द्वारे एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल, इंदोर, मध्य प्रदेश येथे आयोजित 25 व्या राष्ट्रीय मूकबधिर वरिष्ठ क्रीडा स्पर्धेत जलतरणपटू क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे मास्टर उमेश खाडे सहभागी झाले होते .
त्यांनी या स्पर्धेत 3 सुवर्ण जिंकले आहेत.यामध्ये 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक त्यांनी प्राप्त केले आहे.गेल्या पाच वर्षांपासून मास्टर उमेशच्या नावावर वरील स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम आहेत. उमेश यांनी 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्णपदक 100 मीटर ब्रीस्ट्रोक: सुवर्णपदक 200 मीटर ब्रीस्ट्रोक: सुवर्णपदक 200 मीटर वैयक्तिक पदक: रौप्य पदक 50 मीटर फ्रीस्टाइल: कांस्य पदक प्राप्त केले आहे .
त्यांना उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर या प्रशिक्षकांच्या सजग मार्गदर्शनाखाली सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव बेळगाव येथे पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत .
तसेच त्यांना डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष KLE सोसायटी), Rtn. अविनाश पोतदार, शजयंत हुंबरवाडी (जयभारत फाऊंडेशन), श्रीमती. मानेक कपाडिया, श्रीमती. लता कित्तूर, सुधीर कुसणे, प्रसाद तेंडोलकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .