मुलींना तायक्वांदो स्वसंरक्षण कलेचे प्रशिक्षण
आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त निपाणी येथील के एल ई सोसायटी बी सी ए कॉलेज निपाणी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कॉलेजच्या वतीने मुलींना तायक्वांदो स्वसंरक्षण कला शिकविण्यात आल्या यामध्ये आर्य माकी, ममतम माकी, अलगुल मकी , आर्य जिरगी, ममतम जिरगी, अति संकटाच्या वेळी करावयाच्या हल्ला प्रति हल्ला लॉक, ब्लॉक्स, दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या वस्तूंच्या पासून स्वसंरक्षण अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वसंरक्षण मुलींना देण्यात आले.
यावेळी कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम ज्योती किनिंनगे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज कालच्या धक्का धक्कीच्या जीवनात व असुरक्षित वातावरणामध्ये मुलींना स्वतंत्र वावरणे कठीण बनत चालले आहे तरी अशा वातावरणामध्ये मुलींनी व महिलांनी आत्मसंरक्षण कलेचे प्रशिक्षण आत्मसात करून घेणे काळाची गरज बनत चालले आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वसंरक्षण शिबिरामध्ये एकूण 30 मुलींनी सहभाग घेतला होता शिबिर यशस्वी करण्यासाठी स्नेहल गीड , वर्षा खोत, नम्रता कंकणवाडी, मीना पेंडसे, राहुल गायकवाड, यांनी परिश्रम घेतले.
तर शिबिरामध्ये मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरु तायक्वांदो अकादमी चे मुख्य प्रशिक्षक श्री बबन निर्मले सह परिषक अनुष्का चव्हाण यांनी मुलींना मार्गदर्शन केले.