*बेळगाव मराठी साहित्य संमेलन उद्घाटक*
– *उद्योजक आप्पासाहेब गुरव*
उद्या मराठा मंदिर येथे चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन – 2023
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित संमेलनातून ‘मराठीचा जागर ‘
बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव सर्वांना सुपरिचित आहेत. सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व राजकिय क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता समाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक नागरी समस्या , शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक गरीब गरजू मुलांना सढळ हस्ते मदत , संघ संघटनांची मोट बांधून समाजात वावरताना दिसतात. औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय असल्यामुळे त्यांचे कारखानदार व कामगार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व व राजकिय इच्छाशक्ती असून जणतेची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे .
मराठा मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.सुभाषचंद्र नगर नागरी संघटनेचे अध्यक्षपद तसेच लायन्स क्लब ऑफ बेळगावचे
अध्यक्षपद भूषविले होते. याकाळात नेगशिबीर भरून 64 लोकांच्या मोफत शस्त्रकिया केल्या होत्यातसेच बेळगाव फॉड्री क्लस्टर , बेळगाव जिल्हा हॉकी संघटना , बेळगाव जिल्हा शरिरसौष्ठव संघटना व बेळगाव कोल ॲन्ड कोक असोशिएशन यांचे सदस्य आहेत .
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून अनेक गरुजांना मदत केली आहे . मार्गदर्शन शिबिरे आयोजन , बेळगाव शहरात पहिल्यांदा जिजाऊ जयंती साजरी करण्याचा संकल्प यशस्वी केला आहे . चंदगड कोवाड भागातील पुरग्रस्तांना सढळहस्ते मदत केलेली आहे .
मराठी भाषा , संस्कृती जतन करण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी धडपड वाखण्यासारखी आहे . ते महाराष्ट्र एकिकरण समिती चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रत्येक कार्यात व लढ्यात सहभागी असतात.
हे साहित्य संमेलन भरविण्यासाठी त्यांचे योगदान भरपूर असून संमेलन यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतात. ते आज एक कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या गुणांमुळे उभरते व्यक्तीमत्व म्हणून सर्वांच्या सुपरिचयाचे आहेत .
शब्दांकन
रवी पाटील