हे कवी रंगवणार काव्य मैफिल
अखिल भारतीय साहित्य परिषद व मराठा मंदिर पुरस्कृत ४ थे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 5 मार्च रोजी मराठा मंदिर येथे आयोजित केले आहे. ग्रंथ दिंडी, अध्यक्षीय भाषण, कथाकथन, कवी संमेलन , हास्य तुषार असे साहित्याच्या विविध पैलूंनी सजलेले हे संमेलन असेल . कवी संमेलनात निमंत्रितांसह स्थानिक कवीनाही संधी देण्यात आलेली आहे. पुण्याचे अनिल दीक्षित, सांगलीचे रमजान मुल्ला , बेळगावचे मधु पाटील , शितल पाटील, अस्मिता आळतेकर आपल्या कविता सादर करणार आहेत .
अनिल दीक्षित हे पुण्याचे कवी असून त्यांच्या
” आई ” या दीर्घकाव्यसंग्रहाच्या पाच आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ब्लफमास्टर,काजळमाया या व्यावसायिक दोन अंकी नाटकांचे लेखन व रंगभूमीवर प्रयोग सादर केले आहेत.” ब्लफमास्टर ” या मराठी चित्रपटासाठी कथा व संवाद लेखन त्यांनी केले आहे.न्यूज १८ लोकमत,एबीपी माझा, झी २४ तास,जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, सह्याद्री दूरदर्शन इत्यादी
सर्व चँनल्सवरुन कविता सादरीकरण केले आहे.
सह्याद्री वाहिनीवरील “माझी माय ” या लोकप्रिय कार्यक्रमात आईसह सहभाग घेतला.
सह्याद्री वाहिनीवरील अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक विषयावरील ” चकवा ” या मालिकेसाठी लेखन केले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावरील चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत.महाराष्ट्रभर हजारो कविसंमेलनात कविता सादर केल्या आहेत.
त्यांना आम्ही गदिमांचे वारसदार ,गुंडेवाडी काव्य पुरस्कार,
शब्दधन काव्य पुरस्कार,
शिवांजली पुरस्कार,
लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार ,मानव अधिकार पुरस्कार,आचार्य अत्रे विडंबन काव्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
रमजान मुल्ला सांगलीचे असून काळजातल्या कविता या मंचीय कार्यक्रमाचे दीड हजार पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केले आहेत.अनेक नामवंत व्याख्यानमाला मध्ये कवितेतून, व्याख्यानातून प्रबोधन केले.महाराष्ट्रभर असलेल्या अनेक आकाशवाणी केंद्रावरून कविता व कथांचे सादरीकरण केले.महाराष्ट्र तसेच बेळगाव परिसरात होणार्या अनेक साहित्य संमेलनात कविसंमेलन अध्यक्ष म्हणुन निमंत्रित होते
‘घायाळ हरीणी’ या मराठी चित्रपटात गीत लेखन केले.
मुंबई विद्यापीठाच्या बीए भाग ३ मध्ये त्यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश केला गेला. त्यांचा
*अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त* हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
त्यांना अनेक साहित्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मधू पाटील हे बेळगावातील
कवी असून व्यवसायाने
सिव्हिल इंजिनियर आहेत.
भाग्योदय सोसायटीचे संस्थापक चेअरमन,
मार्कंडेय व्यायाम मंदिर सह संस्थापक,
जायंट्स ग्रुप फाउंडर मेंबर अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. शेती व
सामाजिक कार्याची आवड
त्यांना आहे. ते अनेक संघटनांचे सदस्य आहेत.
दिवाळी अंकातून लेखन केले आहे.त्यांच्या अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
साम्यवादी, स्मार्ट न्यूज, संदेश न्यूज, वार्ता या साप्ताहिक व अनेक पुरवणीतून लेखन केले आहे.काव्य लेखन स्पर्धातून दीडशे बक्षीसे मिळवणारे बेळगावातील पहिले कवी म्हणून प्रसिद्ध आहेत .
अस्मिता आळतेकर या बेळगावच्या असून साहित्यलेखन,कविता लेखन-वाचन, सामाजिक,शैक्षणिक उपक्रम घेण्यात त्यांचा सहभाग आहे . त्यांचे
नदीकिनारी ,सावली काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तसेच सहा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत .
त्यांना नाट्य अभिनय (देशस्थ ऋग्वेदी बेळगाव )साहित्यिक आणि सामाजिक सेवा पुरस्कार ,
वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले आहे. शारदोत्सव,मंथन सोसायटीच्या अनेक स्पर्धांतून यश संपादन केले आहे.अनेक कवी संमेलनात अतिथी,परीक्षक,सुत्रसंचालक म्हणून काम केले आहे.
शीतल ग. पाटील याप्रसिद्ध संत साहित्यीक, बाळासाहेब जांगळे यांची कन्या आहेत.शिक्षकी पेशा बरोबर त्यांनी साहित्य- कविता, कथा, ललित लेख लिहलेले आहेत.
अल्पावधीत त्यांचे लेखन नावारूपास आले आहे.
त्यांना अखिल भारतीय कविता स्पर्धा साई प्रतिष्ठान पुरस्कार ,मॅक्स लाइफ इन्शुरन्स -शिक्षा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .मंथन कल्चरल अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे कथा अभिवाचन स्पर्धा बक्षीस मिळाले आहे त्यांनी संदेश न्यूजच्या विविध विशेषांकात लेखन केले आहे .