This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

बनशंकरी मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

बनशंकरी मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

बनशंकरी मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

एंजल फाउंडेशन च्या वतीने भडकल गल्ली येथील बनशंकरी मंदिर येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एन्जल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके महापालिका उपायुक्त भाग्यश्री हुगी, जेट किंग च्या संचालिका रत्ना कुलकर्णी आणि निर्मला जिरली उपस्थित होत्या.

प्रारंभी दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वगुरू बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार ला उत्तर देताना एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी महिलांनी कशाप्रकारे पुढे जावे एकमेकांना त्यांनी पाठिंबा द्यावा आणि आपण काय करू शकतो हे सिद्ध करून दाखवावे असे मार्गदर्शन केले.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी देखील आपली मनोगत व्यक्त करून महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीत खुर्ची पोटॅटो गेम आणि फॅन्सी ड्रेस या स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.

त्यानंतर महिला मंडळाच्या सदस्यांनी एकमेकांना हळदीकुंकू आणि वाण देऊन हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पाडला. यावेळी प्रास्ताविक सारिका चिटगी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता नाईक यांनी केले व आभार सविता हलगती यांनी मानले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply