महाराजांच्या स्मारकाच्या कामात तरी सोडायचे होते 40% कमिशन
निष्कृष्ट काम करावे तर किती करावे याला काहीतरी मर्यादा असते मात्र महिन्याभरातच येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या स्मारकाचे दगड निखळू लागले आहेत.
महिना उलटला नाही तोवर स्मारक आवारातील पायरीचे दगड निखळू लागले आहेत. त्यामुळे सुशोभीकरण कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.
लाखो रुपये खर्च करून त्याचबरोबर स्मारकाचे उद्घाटन करण्याकरिता अफाट खर्च करून काय उपयोग झाला अशी चर्चा नागरिकांमधून रंगली आहे.
निवडणुकीच्या काळात श्रेय लाटण्याकरिता अनुसार पण सोहळ्या अर्धवट कामे ठेवून लोटण्यात आला त्यामुळे आता या सुशोभीकरण कामाचे निकृष्ट दर्जाचे चित्र समोर आले आहे.
त्यामुळे आधी सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करा आणि चांगल्या दर्जाचे करा असे नागरिक सांगत आहेत त्याचबरोबर जर काम चांगल्या दर्जाचे केले तर तुमचे नाव आपोआप होईल असे देखील नागरिकांमधून सध्या बोलले जात आहे.
निवडणुकीच्या काळात सर्व श्रेय आपल्याला मिळावे आणि नागरिकांचे मत कामं केली म्हणून आपल्याला मिळावे या हेतूने अर्धवट असलेली कामे पूर्ण झाली असल्याचे भासून अनेकांनी जो उद्घाटनाचा घाट घातला होता तो आता त्यांच्यावरच उलटला असल्याचे दिसून येत आहे.